(जिएनयु लिनक्स आणि इतर कार्यक्रमांचे भारतीय भाषांमध्ये स्थानिकीकरण)
इंग्रजीचे फारसे किंवा अजिबात ज्ञान नसलेल्या भारतातील व्यापक वर्गासाठी संगणक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्न करण्यासाठी सहकार्याची हाक देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या वेबसाईटमध्ये आपले स्वागत आहे. सद्यस्थितीतील सर्व कार्यांची नोंद करणे, त्याविषयी जनजागृती करणे, भाषांतर करणे, त्यासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री उपलब्ध करुन देणे, सॉफ्टवेअर साधने निर्माण करणे, आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक सॉफ्टवेअर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करुन सॉफ्टवेअरचा मुक्तपणे वापर करण्यास उत्तेजन देणे या बाबींवर आमचा भर राहील.
स्थानिकीकरण म्हणजे नेमके काय?
याचे उत्तर खालील चित्रांवरुन स्पष्ट होईल :
| ओपन आॅफीस | डा.जीओ |
| यूडीट | |
अधिक चित्रांसाठी येथे क्लिक करा ...
ओपनऑफीसमध्ये मराठी 'मोझीला'मध्ये आमची वेबसाईट कॉन्कररमध्ये आमची वेबसाईट
वरील चित्रांत विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादीत केलेले कार्यक्रम दिसत आहेत. या चित्रात शालेय भूमितीसाठी उपयुक्त असा संगणक कार्यक्रम, डॉ. जिओ मराठीमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर युडीट नावाच्या एक युनीकोडवर आधारीत बहुभाषिक संपादक दिसत आहे.
आम्हाला असेच इतरही अनेक कार्यक्रम भारतीय भाषांमध्ये घ्यायचे आहेत. हे कार्य व्यापक आणि दीर्घकालीन असले तरी अशक्य नाही. फक्त त्यासाठी प्रामाणिक आणि नियोजनबद्ध प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आमचा दृष्टिकोन आणि कार्य हेतूविषयी अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी उद्देश या बटणावर क्लिक करा.
एकत्र काम करण्यासाठी आम्ही केलेले आवाहन आपण आवाहन या बटणावर क्लिक करुन पाहू शकाल.
आम्ही स्थानिकीकरण केलेले किंवा करित असलेले काही कार्यक्रम डाउनलोड करण्यासाठी डाउनलोडया बटणावर क्लिक करा. हे कार्यक्रम आपल्या भाषेत अनुवादीत करण्यासाठी आवश्यक ती साधनेही आपल्याला येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
टीप : ही वेबसाइट आजही पूर्णावस्थेत आलेली नाही. त्यामुळे ती सतत बदलत आणि विकसित होत आहे.
